“कर्नाटक, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप”

मुंबई |  मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी ऐन धुळवडी दिवशी राजकीय भूकंप केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला हा मोठा धक्का मानण्यात येतोय. काँग्रेसशासित राज्यांमध्ये मध्य प्रदेशच्या भूकंपाने हादरे बसणार का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

कर्नाटकातलं काँग्रेसचं सरकार भाजपने काही महिन्यात उथलवून टाकलं. सिद्धरामैय्या यांच्या सरकाराला भाजपने धक्का देत पुन्हा एकदा कर्नाटकचा गड काबिज केला. त्यानंतर आता मध्यप्रदेशमधलं कमलनाथ सरकार धोक्यात आलं आहे. त्याचे हादरे महाराष्ट्रात देखील बसणार का? याच्या चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षात बंडखोरी होणार असल्याचं भाकीत केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं आहे.

दुसरीकडे मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून…असं ट्वीट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. भाजपच्या अनेक सोशल मीडिया हँडलवर देखील महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होईल, अशी भविष्यवाणी वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नेमकी काय राजकीय उलथापालथ होतीये, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

#Corona पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5; आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोनाच्या भीतीने आईचा जीव कासावीस; मुलाला केलेला कॉल व्हायरल…

“काका जरा जपून महाराष्ट्रातही धक्का बसायचा”

“मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची गरज नाही”

पुण्यात ‘रंगाचा झाला बेरंग; दोन गटात तुफान राडा!