पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

पुणे | पुण्यातील शिवाजीनगर गावठाण परिसरात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या परिसरातील एका बंद घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संभाजी बापू शिंदे (वय 75), शोभा संभाजी शिंदे (वय 70) असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. शिंदे दाम्पत्य शिवाजीनगर गावठाण परिसरात राहत होते. या दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं त्यामुळे ते दोघेच राहत होते. नातेवाईक या दोघांच्या भेटीला अधूनमधून येत असत पण पुण्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोणीच भेटायला आलं नव्हतं.

मृत वृद्ध महिलेच्या बहिणीची मुलगी शोभा गेल्या काही दिवसांपासून यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कोणताही संपर्क होत नसल्यामुळे ती डबा घेऊन या दोघांच्या भेटीला आली. दरवाजा वाजवूनही आतून कोणी दार न उघडल्याने शोभा यांनी शेजारांच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना या दाम्पत्याचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाले.

शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. या दाम्पत्याचा मृत्यू 5 ते 6 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

उदयनराजेंचा शपथविधी वादग्रस्त ठरल्यानंतर आता राज्यपालांचं उपराष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

कॅप्टन एका ठिकाणीच बसलेत, अन् मी मात्र फिरतोय- शरद पवार

“रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर आता तरी झेंडा फडकवू नका”

कोरोनानं त्यांचं आयुष्यच बदललं!; देहव्यापार सोडून सुरु केलं ‘हे’ काम

आता मुख्यमंत्र्यांनाच झाली कोरोनाची लागण; म्हणाले, संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्या!