मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. मलिकांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडी आणि केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.
पीएमसी बँक घोटाळ्यात आरोपी असलेला वावधान नील सोमय्यांच्या कंपनीत संचालक आहे. या घोटाळ्यातील पैसा एका प्रकल्पात गुंतवलेला असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.
त्यामुळे नील सोमय्या यांना अटक होणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होती. त्यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
अशातच नील सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीशांनी जामीन अर्ज मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिल्यानं आता नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संजय राऊत आम्हाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर राग काढायचा होता तर नील सोमय्या यांच्यावर आरोप करण्याची आवश्यकता नव्हती, असं सोमय्या यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर नवाब मलिकांनी युक्रेनमध्ये जावं”, निलेश राणेंचा मलिकांना सल्ला
“लवासाप्रकरणी शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा कधी दाखल करणार?”
मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल
“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं”