बीड : बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजपच्या आमदार आणि त्यांच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी केज पासून जवळच स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी उभारली. या सूतगिरणीमधील गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना संचालक पदावर नियुक्त केलं होतं. या विरोधात केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.
फिर्यादींनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ. विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फौजदारी संहिता कलम 153(3)अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत.
संगीता ठोंबरे या भाजपच्या आमदार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यसस्फोट; म्हणतात… – https://t.co/cIbHSXI5ZZ @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
देशाला, राज्याला भाजपशिवाय पर्याय नाही- हर्षवर्धन पाटील- https://t.co/AB8LRM6nd3 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
देशाला, राज्याला भाजपशिवाय पर्याय नाही- हर्षवर्धन पाटील- https://t.co/AB8LRM6nd3 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019