नवाब मलिकांना न्यायालयाचा पुन्हा दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं अटकेचं प्रकरण गाजत आहे. पीएमएलए न्यायालयानं सातत्यानं मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे.

मलिक यांना घरचं जेवण आणि औषधांसाठी परवानगी दिली आहे. न्यायालयीन कोठडीदरम्यान त्यांना बेड, गादी आणि खुर्ची देण्याची विनंती मान्य करण्यात आली होती.

माफिया डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 23 फेब्रुवारी रोजी मलिक यांना अटक केली होती.

नवाब मलिक यांच्या कोठडीत आता आणखीन वाढ करण्यात आली आहे. मलिकांना 20 मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याने परिणामी मलिकांना मोठा धक्का बसला आहे.

नवाब मलिक यांच्याकडील खात्यांचा कारभार सध्या राष्ट्रवादीचे इतर दोन मंत्री पाहात आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मलिकांच्या राजीनाम्यावर अद्यापी निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आपली अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, मलिक यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा मलिक यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीने केला आहे. राजकीय सूडबुद्धीतूनच मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल

  “गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”

राणा दाम्पत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं, म्हणाले…

 कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

  Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका