‘ते सगळं ठीक पण ब्लाऊज कुठेय’, ‘त्या’ फोटोमुळे प्राजक्ता माळी ट्रोल

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्यानं सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. चाहते मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंना पसंत देखील करतात.

सध्या प्राजक्ताच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात प्राजक्ताचे फोटे शेअर केले जात आहेत.

पिच रंगाच्या चंदेरी सिल्क साडीतील फोटो प्राजक्तानं आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर हजारो लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्तानं या फोटोत ब्लाऊज घातलेलं दिसत नाही. परिणामी तिच्यावर चाहते प्रश्नांचा मारा करत आहेत. अशावेळी हे फोटो वादग्रस्त देखील ठरत आहेत.

शारद सुंदर चंदेरी राती, थंड या हवेत घेऊन कवेत, असं कॅप्शन प्राजक्तानं फोटो शेअर करताना दिलं आहे. परिणामी कॅप्शनच्या वेगळेपणाची देखील चर्चा होत आहे.

प्राजक्ताला साडी सावरता येत नाही तर नेसायची कशाला?, ब्लाऊज घालायला विसरलीस का?, अशाप्रकारचे संतापजनक प्रश्न अनेक नेटकरी विचारत आहेत.

दरम्यान, प्राजक्तासोबतच अनेक अभिनेत्रींना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. अशात आता प्राजक्ता या प्रकरणावर काय बोलते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘बहुजनांना तुमच्यासारखा काकांचा हुजऱ्या समजू नका’; पडळकरांंचा हल्लाबोल

  “गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात, इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत?”

राणा दाम्पत्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं, म्हणाले…

 कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

  Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका