‘सर्व मोदी चोर आहेत’ म्हणणाऱ्या राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली। ‘सर्व मोदी चोर आहेत’ या वक्तव्यावरुन झारखंड उच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे  खासदार राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. पुढील आदेश देईपर्यंत राहुल गांधी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, असे न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये म्हटलं आहे.

लोकसभेच्या प्रचारावेळी ‘सर्व मोदी चोर आहेत’ या वक्तव्यावरुन राहुल गांधी अडचणीत सापडले होते. याप्रकरणात रांचीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरु आहे. स्थानिक न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधींना नोटीस धाडून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

याविरोधात राहुल गांधींनी झारखंडच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.  राहुल गांधी यांना दिलासा देताना न्यायालयाने त्यांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील प्रदीप मोदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. विरोधात खटला दाखल करणारे वकील प्रदीप मोदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कोर्टाने राहुल गांधीना दिलासा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-पुराचा फटका बसलेलं ‘हे’ गाव घेतलं भाईजाननं दत्तक

-“आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव चुकून राहिलं”

-“राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे; शहाजी आपण आहात तरी कुठं?”

-अमृता खानविलकर करणार बिग बॉसमध्ये प्रवेश?

-दोन हजारांच्या नोटासंदर्भात अर्थमंत्री सीतारामण यांनी केला मोठा खुलासा!