पुराचा फटका बसलेलं ‘हे’ गाव घेतलं भाईजाननं दत्तक

मुंबई |  बॉलिवूडचा ‘भाईजान’ असलेल्या सलमान खानने महाराष्ट्रात झालेल्या अतवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका बसलेल्या एका गावासाठी दिलदार झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून पूरग्रस्तांना तो पक्की घरं बांधून देणार आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. बरीच गावं पाण्याखाली जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. तत्कालीन राज्य सरकारपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला होता.

सलमान खानची चित्रपट निर्मिती संस्था ‘सलमान खान फिल्म्स’ आणि गुरुग्राम येथील ‘ऐलान फाऊंडेशन’ या दोन संस्थांनी मिळून खिद्रापूर गाव दत्तक घेतल्याची माहिती आहे. अद्याप सलमान खानकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांची मोडकी घरं पुन्हा बांधून देण्यासाठी ‘भाईजान’ने उशिरा का होईना, धाव घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आमच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव चुकून राहिलं”

-“राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे; शहाजी आपण आहात तरी कुठं?”

-अमृता खानविलकर करणार बिग बॉसमध्ये प्रवेश?

-दोन हजारांच्या नोटासंदर्भात अर्थमंत्री सीतारामण यांनी केला मोठा खुलासा!

-…म्हणून नागराज मंजुळेंना पुण्यात शिकत असताना वाटायची भीती