अंबाती रायुडू पुन्हा मैदानात; निवृत्तीचा निर्णय घेतला मागे

मुंबई : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीचा निर्णय आपण भावनेच्या भरात घेतल्याचे रायुडू याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपली सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचेही पत्रात लिहिले आहे.

रायुडू याने पत्रात चेन्नई सुपर किग्स, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेव्हीडचे आभार मानले आहेत. ‘ यांनी माझ्या कठीण काळात मला पाठिंबा दिला. माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. याच कारणामुळे मी माझ्या निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे. हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता, असंही अंबाती रायुडू म्हणाला. 

रायुडू पुढे म्हणतो, ‘मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत असून सर्व प्रकारचा क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. पुढील मोसमात माझी हैदराबाद संघासोबत खेळण्याची इच्छा आहे. मी माझे सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी येत्या 10 सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध असेन.’

वर्ल्डकप स्पर्धेक शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतीमुळे माघारी आल्यानंतर देखील बीसीसीआयने रायुडूच्या नावाचा विचार केला नव्हता. रायुडूऐवजी बीसीसीआयने ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांची निवड केली होती. यामुळे रायुडू नाराज झाला होता. त्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. 

महत्वाच्या बातम्या-