शिवसेनेकडून विनोद पाटील यांना खुली ऑफर!

औरंगाबाद : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ‘जनाशिर्वाद यात्रे’दरम्यान औरंगाबाद येथे गेले होते त्यावेळी त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

किती दिवस बाहेर राहता आमच्यात येवून जा, अशी ऑफर आदित्य ठाकरेंनी विनोद पाटलांना दिली आहे. यात्रेच्या निमित्ताने ते नागरिकांशी संवाद साधणार होते. त्यांचा मुक्काम एका हॉटेलमध्ये होता. हॉटेलमधून जनाशिर्वाद यात्रेकडे जाताना विनोद पाटील यांच्या घरी ते गेले होते.

येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. आदित्य ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर एकदम निर्णय घेता येणार नाही विचार करुन सांगतो, असं विनोद पाटील आदित्य ठाकरे यांना म्हणाले आहेत.

दरम्यान, विनोद पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी  न्यायालयीन लढाई लढली आहे.

महत्वाच्या बातम्या-