पुणे | राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण आणि भोंग्याचा वाद हे दोन्ही प्रकरणं जोरदार पेटलेली दिसत आहे.
दिवसेंदिवस दोन्ही प्रकरणं चिघळत चाललेली पहायला मिळत आहे. अशातच काल राणा दाम्पत्यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे.
राणा दाम्पत्यांना मिळालेल्या दिलास्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
देशात सध्या दिलासा घोटाळा सुरु आहे. गुन्हे आणि आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात. इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत, हा संशोधनाचा विषय आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ज्याप्रकारची राजवट सध्या देशात सुरू आहे ते पाहून असं वाटतंय की इंग्रज बरे होते, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुण्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.
काल नवनीत राणा आणि रवी राणा यांची तुरुंगातून सुटका झाली. तब्बल 13 दिवसांनंतर ते तुरुंगातून बाहेर आले.
राणा दाम्पत्यांना मिळालेल्या दिलास्यानंतर आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…