फक्त 7 लाख रुपये खिशात घेऊन जा; ‘या’ 3 एसयूव्ही गाड्या होऊ शकतात तुमच्या

मुंबई | भारतीय मोटार बाजार हा जगातील आघाडीचा बाजार म्हणून नावारूपास येत आहे. आजच्या घडीला भारतात जगातील नामांकित कंपन्या आपल्या चारचाकी घेऊन उतरल्या आहेत.

भारतीय बाजारामध्ये सध्या पर्यावरणपुरक गाड्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. केंद्र सरकारनं देखील आता देशाची ऑटोमोबाईल पाॅलिसी बदलली आहे. परिणामी स्पर्धा वाढली आहे.

एखादी आकर्षक चारचाकी गाडी आपल्याकडंही असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. चारचाकी गाडी घेण्यासाठी अनेकजण आपली जमा केलेली संपत्ती खर्च करत असतात.

चारचाकी गाडी घेताना सर्वांना गाडीची वैशिष्ट्ये माहिती असणं आवश्यक आहे. सध्या भारतीय बाजारामध्ये एसयूव्ही गाड्यांना मोठी मागणी आहे. परिणामी एसयूव्ही गाड्यांच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे.

सर्वात परवडणाऱ्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीपैकी एक रेनॉल्ट किगरची सुरुवातीची किंमत 5.79 लाख ते 10.22 लाख रुपये आहे. रेनॉल्टने या एसयूव्ही मध्ये 1.0 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल दिले आहे

निसान मॅग्नाइटमध्ये कंपनीने 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी डेटाइम रनिंग लाईट्ससह एलईडी हेडलॅम्प, रियर एसी व्हेंट्स आणि ऑटो एसी यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.

निसान मॅग्नाइटची किंमत 5.76 लाख रुपये ते 10 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यावर, तुम्हाला 7 लाख रुपयांमध्ये 3 रंगांचे पर्याय मिळतील.

ह्युंदाईचे बेस मॉडेल 7 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. या कारची किंमत 6.99 लाख रुपये ते 11.76 लाख रुपये आहे.

दरम्यान, या चारही कंपनीच्या एसयूव्ही गाड्या घेण्यासाठी सध्या बाजारामध्ये ग्राहकांची चढाओढ लागली आहे. एसयूव्ही गाडी आपल्या खास फिचरसह ग्राहकांना सुविधा पुरवते.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश 

IPL 2022 Auction | शिखर धवनचा पहिला नंबर; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

“राजभवानातील नाचणारे मोर हे डसणाऱ्या सापापेक्षा बरे”