‘या’ किसिंग सीनमुळं तापलं वातावरण, अभिनेत्याला थेट चुलत्याचा आला फोन

मुंबई | दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ‘गहराइयां’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे.

आधुनिक नातेसंबंध आणि भूतकाळातील आघातांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दीपिका आणि सिद्धांतचे अनेक बोल्ड सीन्स देखील आहेत.

या चित्रपटाचे अनेक व्हिडीओ देखील आता समोर येत आहेत. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये संपूर्ण टीम पोहोचली होती. त्यावेळी सर्वांनी या चित्रपटाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

तु तुझ्या स्क्रिप्ट पालकांना सांगतो का ?, असा सवाल या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना सिद्धांत चतुर्वेदी यांनी हो म्हटलं आणि नंतर एक किस्सा सांगितला.

गहराइयांचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याला त्याच्या गावातील एका दूरच्या काकांनी म्हणजेच चुलत्यांनी बोलावलं होतं. ट्रेलरमध्ये सिद्धांत आणि दीपिकामध्ये नेमकं काय चाललंय, असं काकांनी सिद्धांतच्या वडिलांना विचारलं.

दोघंही एकमेकांच्या ओठांना स्पर्श करत आहेत की मध्ये आरसा लावला आहे?, असा सवाल विचारला होता. याला मी काय उत्तर देऊ, असं सिद्धांतचे वडिल म्हणाले.

सिद्धांतने हा किस्सा सांगितल्यानंतर कार्यकर्मात हशा पिकल्याचं पहायला मिळालं आहे. त्यावेळी अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचं पहायला मिळालं होतं.

दरम्यान, या चित्रपटात दीपिका पदुकोण योग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे, जी तिच्या भूतकाळातील आघातांचे भार पेलून आयुष्यात पुढे जात असल्याची कहाणी आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

फक्त 7 लाख रुपये खिशात घेऊन जा; ‘या’ 3 एसयूव्ही गाड्या होऊ शकतात तुमच्या

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला संघात घेण्यात अपयश 

IPL 2022 Auction | शिखर धवनचा पहिला नंबर; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट