“होय, मी हिंदू असल्याने पाकिस्तानी खेळाडू मला त्रास द्यायचे”

इस्लामाबाद | पाकिस्तानच्या क्रिकेट संघात दानिश कनेरिया खेळताना तो केवळ हिंदू आहे म्हणून त्याला वाईट वागणूक दिली जात होती, असा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला होता. यावर दानिशने खुलासा केला असून शोएब अख्तरची प्रत्येक गोष्ट खरी असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

शोएब अख्तरनं सांगितलेलं सर्व खरं आहे. शोएबनं याबाबत खुलासा केला त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मी केवळ हिंदू असल्याने मला त्रास दिला जायचा. माझ्याशी न बोलणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूची यादी मी जाहीर करणार आहे, असं दानिश म्हणाला आहे.

मला अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांविषयी बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती. पण आता मी बोलणार आहे. त्या सर्वांची नावं मी जाहीर करणार आहे, असं दानिश म्हणाला आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच दानिशच्या वक्तव्याने ज्वर वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-