Top news मनोरंजन

याड लागलं! डेव्हिड वाॅर्नरला लागलंय ‘पुष्पा’चं याड, आणखी एक व्हिडीओ व्हायरल

devid warner pushpa e1643106233488
Photo Credit- instagram/davidwarner31

मुंबई | गावच्या गल्लीतील पोरापासून ग्लोबल लेव्हलवर सर्वांनाच सध्या दाक्षिणात्य चित्रपट पुष्पानं आपल्या प्रेमात पाडलं आहे. पुष्पा दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालला आहे. अशात क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांची भंबेरी उडवणारा डेव्हिड वाॅर्नर पुष्पाच्या प्रेमात पडला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांचा स्टार अभिनेता अल्लू अर्जुन, नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असणारी रश्मीका मंधाना, आपल्या अदाकारिनं सर्वांना घायाळ करणारी समांथा यांच्या अप्रतिम अभिनयानं हा चित्रपट नटला आहे.

पुष्पराज या व्यक्तीच्या भूमिकेत अल्लू अर्जुनला सर्वजण पसंत करत आहेत. अल्लू अर्जुनच्या प्रत्येक डायलाॅगवर सध्या व्हिडीओ बनवण्यात येत आहेत. सध्या ते व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आपल्या घातक फलंदाजीच्या बळावर जगातील भल्या भल्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणार फलंदाज डेव्हिड वाॅर्नर सध्या भारताच्या आणि पुष्पाच्या प्रेमात पडला आहे. आतापर्यंत वाॅर्नरनं पुष्पा सिनेमातील डायलाॅगवर व्हिडीओ बनवले आहेत.

वाॅर्नर हा सध्या इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमातील अनेक डायलाॅगचे व्हिडीओ पोस्ट करत आहे. अल्लू अर्जूनच्या खास शैलीत वार्नर व्हिडीओ बनवत आहे. काही दिवसांपूर्वी वार्नरच्या मुलींचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आता खुद्ध वाॅर्नरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जूनच्या अंदाजाची आणि स्टाईलची भुरळ वाॅर्नरला पडली आहे. परिणामी अल्लू अर्जूनच्या स्टाईलमध्ये वाॅर्नरनं व्हिडीओ बनवला आहे.

पुष्पा सिनेमातील अल्लूच्या विविध स्टाईलला वाॅर्नरनं एका व्हिडीओत लयबद्ध केलं आहे. जंगलातील हातात घेऊन उभा असणारा वाॅर्नर या सर्वांमध्ये अल्लूसारखाच दिसत आहे.

दरम्यान, अल्लू जेव्हा चंदण तोडताना पोलिसांना भिडतो त्या सिनला देखील वाॅर्नरनं आपल्या व्हिडीओत समाविष्ट केलं आहे. परिणामी सध्या वाॅर्नरचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

महत्त्वाच्या बातम्या –

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”

“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”

 महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; Google ने घेतला हा मोठा निर्णय