अजित पवारांचं सैन्य दलाला पत्र; लोकांनो आता तर घराबाहेर पडूच नका…!

मुंबई |  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाने देशात तर राज्य शासनाने राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. असं असताना देखील काही नागरिक विनाकारण बाहेर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सैन्याला पूर्वसूचनचा देणारं पत्र लिहिलं आहे.

गरज लागली तर आम्ही सैन्याची मदत घेणार आहोत, असं अजित पवार यांनी अगोदरच सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज मी त्यांना पत्र लिहिलं आहे. राज्य शासन सैन्यदलाच्या संपर्कात आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्याकरिता वेळ पडली तर सैन्याला पाचारण करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. तसंच वैद्यकीय मदतीची गरज पडली तर आम्ही सैन्याची मदत घेऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, डॉक्टर आणि पोलिसांवर हल्लाच्या घटना बुधवारी आणि गुरूवारी उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आता राज्य शासनाने कठोर पावलं उचलत त्यांच्यावरील हल्ले आम्ही सहन करणार नसल्याचं सांगत वेळ पडली तर आम्ही सैन्याला बोलावू आणि बेशिस्त नागरिकांना शिस्त लावू, असं शासनाने स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!

-‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

-फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

-कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर