जरांगेंच्या ‘त्या’ मागणीबाबत सरकारमधील मंत्र्यांचा मोठा खुलासा!

Deepak Kesarkar | राज्यात मराठा आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं असलं तरी जरांगेंनी आंदोलनाला पूर्णविराम दिलेला नाहीये या मागचं कारण म्हणजे जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षणासाठी मागणी केली आहे. अशात काही वेळा पूर्वी जरांगेंनी पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केलीये. जरांगेंनी केलेल्या त्या घोषणेवर मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत खुलासा केलाय.

काय म्हणाले दिपक केसरकर?

माध्यामांशी बोलत असताना दिपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, सरकारने जरांगेंच्या मागण्या पुर्ण केल्या. मराठा आरक्षणासाठी काल एक दिवसीय आधिवेशन घेण्यात आलं. या वेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी यामध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. पुढे ते म्हणाले की, मराठा आरक्षण मुद्दा होता, अडीच कोटी लोकांचं एवढं मोठं सर्वेक्षण केलं आणि आरक्षण विधेयक मंजूर केलं. या आनंदात मनोज जरांगे यांनी सहभागी व्हायला हवं होतं.

हे बोलत असताना केसरकर असं देखील म्हणाले की, सगेसायरे कायद्याबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यावर विचार सरकारला करावा लागणार आहे. नाहीतर कोर्टात पुन्हा ते टिकणार नाही. याबाबतची सगळी प्रक्रिया पूर्णच करावी लागते.

जरांगेंची ती मागणी पूर्ण होईल-

दरम्यान, यावेळी बोलत असताना केसरकर म्हणाले की, या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखनाथ शिंदे या सगळ्याबद्दल संवेदशील आहेत. थोडे दिवस जरांगे पाटील यांनी थांबावं तुमची कुणबी दाखल्याची मागणीसुद्धा पूर्ण होईल, असं म्हणत केसरकर यांनी जरांगे पाटील यांना आश्वस्त केलं.

बोलत असताना केसरकरांनी जरांगे यांच्या प्रकृतीबाबत देखील भाष्य केलं. केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, जरांगे यांच्या तब्येतीची सगळ्यांनाच काळजी वाटते. या वेळी केसरकरांनी जरांगेंना तब्येतीची काळजी घ्या, असं आवाहन केलं.

मराठा समाजाला मोठा धोका-

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळालं आहे. सरकारच्य़ा या निर्णयाचं राज्यभरात काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी टीका होताना दिसत होती. मात्र आता राज्य सरकारनं दिलेलं हे आरक्षण सुद्धा वादात सापडलेलं दिसत आहे. या आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

News Title : deepak kesarkar reveals about maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या-

महिलांनो घरबसल्या करा हे 5 व्यवसाय; अगदी काही तासांतच कमवू शकता हजारो रुपये

“त्या रात्री वाशीत नेमकं काय घडलं?”; मनोज जरांगे पाटलांच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोपांनी एकच खळबळ

अशाप्रकारे कडक उन्हात जनावरांची घ्या विशेष काळजी अन्यथा… होऊ शकत मोठं नुकसान

सरकारने दिलेलं मराठा आरक्षण पुन्हा अडचणीत, मराठा समाजाला धक्का देणारी बातमी

अवघ्या दोन दिवसांत WPL स्पर्धा होणार सुरु! पाहुयात या स्पर्धेबद्दलची A to Z माहिती