‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई | आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन. त्याचा विचार होणार नसेल आणि उद्या आम्हाला जायला लागलं, अविश्वास ठरावावर मतदान करावं लागलं, तर ते मतदान उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसेल, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं शिंदे गटातील शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. भाजपासोबत बोलणी फिसकटल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबत उभे होतो. नंतर जी परिस्थिती उद्भवली, ती त्यांच्यासमोर वेळोवेळी मांडली आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात आहात. एक आमदार फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल देऊ शकत नाही का?, असा सवाल केसरकर यांनी केला आहे.

तुम्ही का आमच्यावर आरोप करत आहात? तुम्हाला कळकळीची विनंती आहे, शेवट गोड करा. त्यात महाराष्ट्राचं हित आहे, पक्षाचं हित आहे, असंही केसरकरांनी सांगितलं आहे.

‌दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेचा सारीपाट अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिल्यामुळे हे राजकीय महानाट्य अजून लांबण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील” 

मंत्र्यांची खाती काढल्यानंतर ठाकरे सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल! 

“दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की…” 

संजय राठोड बंडखोर होताच शिवसैनिक भडकले, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा 

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा