Top news मनोरंजन

“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तराने हैराण झाले एनसीबीचे अधिकारी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक मोठ-मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. त्यातच आता अभिनेत्री दीपिका पदुकोण एका व्हाट्स अ‌ॅप ग्रुपची अ‌ॅडमिन होती. या ग्रुपमध्ये ड्र.ग्जसंदर्भात चर्चा झाल्याचा आरोप झाल्यानं दीपिका पदुकोणच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ड्र.ग्ज कनेक्शनबाबत चौकशीसाठी एन.सी.बीने शनिवारी दीपिका पदुकोणला चौकशीसाठी बोलावले होते. ती गोव्यात दिग्दर्शक शकुन बत्राच्या चित्रपटाची शुटिंग करत होती. तिथे शूटिंग करत असलेल्या दिपिकाला समन्स पाठवली. त्यानंतर दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंह मुंबईत परतली.

तेथून परतल्यानंतर दीपिका एन.सी.बीच्या कार्यालयात पोहोचली. २०१७ मध्ये दीपिकाने ड्र.ग्जबाबत व्हाट्स अ‌ॅपवर चॅट केल्याचा आरोप आहे. या अनुषंगाने एन.सी.बीच्या अधिकाऱ्यांनी दीपिका पदुकोणला विचारले,”माल आहे का ?” याचा अर्थ काय आहे?

या प्रश्नाचे उत्तर देताना दीपिका पदुकोण म्हणाली,”हो मी विचारलं होतं, पण तुम्ही जो माल समजत आहात तो हा माल नाही. आम्ही माल म्हणजे सिगरेटविषयी बोलत होतो. माल हा आमचा सिगरेटचा कोडवर्ड आहे.”

पुढे बोलताना दीपिका पदुकोण म्हणाली, “हॅश आणि वीड टाईप असे वेगवेगळ्या सिगरेटच्या प्रकारांना आम्ही माल म्हणतो. जर मोठी सिगरेट असेल तर आम्ही तिला वीड म्हणतो आणि जर पातळ सिगरेट असेल तर हॅश म्हणतो.”

एन.सी.बीच्या प्रश्नांना उत्तर देताना दीपिकाने ड्र.ग्ज सेवन करण्याच्या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला. दीपिका हिने डूब्सलाच सिगरेट म्हणतात, असं सांगितले. दीपिका हिने कोडवर्डविषयी माहिती सांगितली. एक म्हणजे पनीर आणि दुसरे क्विकी एन्ड मॅरेज….

यावर दीपिकाने सांगितले, जे लोक पातळ आहे, त्यांच्यासाठी पनीरचा उपयोग करतात. अशा पातळ लोकांना आम्ही पनीर बोलतो. त्यातच क्विकी एन्ड मॅरेज हे लॉन्ग एन्ड टर्म रिलेशनशिपसाठी वापरले जाते. क्विकी म्हणजे शॉर्ट रिलेशन आणि मॅरेज म्हणजे लॉन्ग रिलेशनशिप…

यातच दुसऱ्या बाजूला करिष्माने मालाबाबत दीपिकाने जे उत्तर दिले, तिनेही अगदी तेच उत्तर दिले. एन.सी.बीच्या सूत्रांनुसार जेव्हा दीपिका कार्यालयात पोहोचली, तेव्हा दीपिका एक-दीड तास खूपच चिंतेत होती, त्यानंतर ती नॉर्मल झाली. दीपिका ही एन.सी.बीच्या कार्यालयात पाच तास होती, पण दीपिका हिची चौकशी साडे तीन तास चालली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी…

गाडीवाल्यांनो चुकूनही करु नका ‘ही’ गोष्टी, नाहीतर भरावा लागेल 5 हजार रुपये दंड!

‘ही’ निर्माती का ढसाढसा रडू लागली आहे? कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

ड्र.ग्ज प्रकरणी अडकलेल्या साराच्या मदतीसाठी वडील सैफ अली खान यांनी उचललं ‘हे’ पाऊल

‘सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा थेट संबंध आहे’; सुशांतप्रकरणी युवराजचा धक्कादायक खुलासा!