दीपिका लवकरच ‘गुडन्यूज’ देणार? परिणिती चोप्रा म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड मधील जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची. बॉलिवूडची ही सुपर कूल जोडी नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिका एका रुग्णालयाबाहेर दिसले होते. यानंतर दीपिका गरोदर असल्याची बातमी पसरली होती. मात्र,यावर दीपिका किंवा रणवीर काहिही बोलले नव्हते. अशातच आता अभिनेत्री परिणिती चोप्राने दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांवर भाष्य केलं आहे. परिणीतने नुकतंच सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधला आहे.

यावेळी एका चाहत्याने परिणीतीला दीपिकाशी संबंधित हाच प्रश्न विचारला होता. रणवीर वडील झाला आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने परिणीतीला केला होता. चाहत्याचा हा प्रश्न ऐकून परिणिती देखील शॉक झाली होती.

यावर उत्तर देताना परिणितीने रणवीरलाच विचारा, असं म्हटलं होतं. तिने यावेळी रणवीर सिंगला देखील टॅग केलं होतं. परिणितीची ही इन्स्टाग्राम स्टोरी खूप वेगानं व्हायरल होत आहे. रणवीरने अद्याप या प्रश्नावर उत्तर दिलं नाही. यामुळे या प्रश्नाचं उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. याविषयी सत्य काय ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्यान, सध्या रणवीर सिंग त्याच्या आईच्या वाढदिवसानिम्मित आयोजित पार्टीमध्ये केलेल्या डान्समुळे चर्चेत आहे. आईच्या बर्थडे पार्टीत रणवीर खूप मजा करताना दिसला. यावेळी रणवीरचे वडील, आई तसेच दीपिका देखील फुल मजा करताना दिसले.

सध्या या पार्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर आपल्या वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी हे दोघे बापलेक एकमेकांना डान्समध्ये टक्कर देत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘शेरशाह’ चित्रपटासाठी सिध्दार्थने घेतलं तब्बल ‘इतके’ कोटी रुपये मानधन

…म्हणून नवरदेवाने भरमंडपात नवरीच्या पायावर डोकं ठेवलं; पाहा व्हिडीओ

हॉट सीन करताना मी प्रचंड घाबरले मग बॉबीने…; ‘आश्रम’ वेबसिरीजमधील अभिनेत्रचा खुलासा!

सलमान खानला अडवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफच्या जवानाचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडीओ!

बिअर पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या!