दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करत दिली माहिती

नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र दिसत असताना देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा देशातील 14 राज्यात शिरकाव झाला आहे. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधित रूग्ण हे महाराष्ट्र व राजधानी दिल्लीत आढळून आले आहेत.

कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना अनेक नेते व मंत्री कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत त्यांना कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना सौम्य लक्षणं असून ते सध्या विलगीकरणात आहेत.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे असून मी स्वत:ला घरात आयसोलेट केलं आहे’, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत दिली आहे.

‘गेल्या काही दिवसात जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ला वेगळे ठेवा आणि आपली चाचणी करून घ्या’, असे आवाहन देखील अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

दिल्लीत सध्या कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीतील तब्बल 59 डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

अनेक राज्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर 123 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशात गेल्या सहा दिवसांत रूग्णवाढीचा वेग जवळपास पाचपटीने वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा कहर, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

व्हिडीओ कॉल उचलताच तिने उतरवले कपडे त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट

“माझ्या नादी लागू नका मी नारायण राणे सारख्या नेत्याला खपवतो, हे तर चिल्लर आहेत”

‘लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 80 टक्के लोकांना..’; पुणेकरांची झोप उडवणारी बातमी समोर