मुंबई | महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल, असं इकबाल चहल यांनी सांगितलं. एनडीटीव्ही या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.
इकबाल चहल यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या अशीच वाढत राहून एका दिवसात 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन करावंच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महापालिकेकडे 30 हजार पेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आहेत व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत सगळी तयारी आमची झालेली आहे, असंही ते म्हणाले.
मुंबईचं कौतुक सर्व स्तरात झालं होतं. यामध्ये सर्वांचं योगदान होतं. मात्र, आता ओमिक्रॉन वाढत आहे. आता मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. नागरिकांनी आपल्याला कोरोना पासून दूर कसं राहता येईल हे पाहावं, असं आवाहन इकबाल चहल यांनी केलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशारा दिला होता.
दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग खूपच वेगाने होत आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशात 33,750 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
भारतात कोरोनाचा संसर्ग खूपच वेगाना होत आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशात 33,750 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
व्हिडीओ कॉल उचलताच तिने उतरवले कपडे त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!
धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी ‘हाच’ सर्वोत्तम उपाय, संशोधनातून महत्वाची माहिती समोर
पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना; गुंतवणूक केल्यास करात मिळेल सवलत
‘…तर इमारत सील केली जाईल’; महापालिकेने जारी केली नवी नियमावली