दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ उमेदवाराच डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला असून भाजपला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा भोपळाही फोडता आलेला नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे 70 पैकी 67 जागांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसचा सुपडासाफ झाल्याचं चित्र आहे.

एकेकाळी काँग्रेसने सलग 15 वर्षे दिल्लीवर राज्य केलं आहे. मात्र, आता काँग्रेसला अस्तित्वासाठी लढावं लागत आहे. आपच्या झाडूने काँग्रेसच्या हाताला चांगलाच झटका दिला आहे. गांधी नगर, कस्तुरबा नगर आणि बादली या तीन मतदारसंघातच काँग्रेसला डिपॉझिट वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या; रुपाली चाकणकर भडकल्या

-भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळत नसतात; शरद पवारांनी काढला राज ठाकरेंना चिमटा

-‘आप’च्या विजयाने अरविंद केजरीवालांनी जन की बात देशाला दाखवून दिली- उद्धव ठाकरे

-केजरीवालाच्या झाडूने सगळय़ांना साफ केलं; ‘सामना’तून भाजपवर जहरी टीका

-कारखान्यातल्या 100 कर्मचाऱ्यांच्या वापर करुन केलं पैशांचं वाटप; रोहित पवार अडचणीत