धक्कादायक! ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय झाला आहे. आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, आम आदमी पार्टीचे महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

नरेश यादव मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात आपचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर यादव मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या गाडीवर चार राऊंड झाडण्यात आले. यावेळी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला दुर्देवी आहे. माझ्यावर हल्ला का करण्यात आला याचं कारण मला माहित नाही, मात्र पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केल्यास हल्लेखोरांना पकडता येईल, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ उमेदवाराच डिपॉझिट जप्त

-थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटू द्या; रुपाली चाकणकर भडकल्या

-भाषणांना गर्दी झाली म्हणजे मतं मिळत नसतात; शरद पवारांनी काढला राज ठाकरेंना चिमटा

-‘आप’च्या विजयाने अरविंद केजरीवालांनी जन की बात देशाला दाखवून दिली- उद्धव ठाकरे

-केजरीवालाच्या झाडूने सगळय़ांना साफ केलं; ‘सामना’तून भाजपवर जहरी टीका