Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले

मुंबई |  गेल्या दोन वर्षापासून सर्व जगावर कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनाच्या आकडेवारीत काही दिवसांपूर्वी घट झाल्याचं पाहायला मिळाल होतं.

कोरोना आकडेवारी घटत असल्यानं सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले होते. पण आता अचानकपणे कोरोना आकडेवारीत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातला आहे. डेल्टाक्राॅन या नव्या व्हेरियंटनं चीनमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना बाधित केलं आहे.

भारतात देखील आता या व्हेरियंटचे रूग्ण आढळल्यानं सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशात डेल्टाक्राॅनचे 568 रूग्ण असल्याची माहिती जीएसएआयडीनं दिली आहे.

कर्नाटकमध्ये 221, तामिळनाडू 90, महाराष्ट्र 66, गुजराज 33, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात 25, नवी दिल्लीत 20 रूग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

डेल्टाक्राॅन (Deltacron) हा एक सुपर म्युटंट व्हायरस आहे. ज्याचे वैज्ञानिक नाव बीए.1 प्लस बी.1. 617.2 असं आहे. डेल्टाक्राॅन हा ओमिक्राॅन आणि डेल्टापासून बनला आहे.

डेल्टाक्राॅनचा धोका सध्यातरी कमी प्रमाणात असला तरी काळजी घेण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर संशोधन चालू असल्याची माहिती आरोग्य संघटनेनं दिली आहे.

दरम्यान, भारतात आता या प्रकारचे रूग्ण आढळत असल्यानं सरकारनं तातडीनं पावले उचलायला सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका

Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”

Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र