मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अशातच आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर करण्यात आलेल्या या ईडीच्या कारवाईनंतर आता राजकीय वर्तुळात वादंग पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
आयबीएन न्यूज 18 शी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी ईडीच्या कारवाईवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या करण्यात आलेल्या कारवाईनंतर तुम्हाला सेफ वाटतं का?, असा सवाल करण्यात आला होता. त्यावर आव्हाडांनी उत्तर दिलं.
मी तर काही चुका वगैरे केलेल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग बिपिंगमध्ये चुका असतील तर, असं आव्हाड यावेळी म्हणाले.
मी अगदी स्पष्टपणे सांगतो, कोणी बोलो अथवा नाही पण भीती ही माणसाला खात असते. रात्री तीन वाजता टक् टक् झालं तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, असंही आव्हाड म्हणाले आहेत.
आज मी 38 वर्षे होत आले राजकारणात आहे. माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध आहे. पण आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं आहे.
दरम्यान, मला तर वाटतं तिने भारतात राहू नये, वातावरण इतकं गढूळ होतंय. मी करोनामध्ये जेव्हा होतो तेव्हा मी तिची जी परिस्थिती बघितलेली तीच मला भीतीदायक वाटत होती, असं भावनिक वक्तव्य देखील आव्हाडांनी यावेळी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले
“भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण