‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’

पटना | बिहार राज्यात गेले दोन दिवसांत मोठी राजकीय उलथापालथ झाली. बिहारमधील भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दल (JDU) युती तुडली. त्यामुळे बिहारचे आघाडी सरकार कोसळले.

त्यानंतर नितीश कुमारांनी राजद (RJD) आणि काँग्रेस (INC) यांच्यासोबत पुन्हा एकदा घरोबा केला. आणि चोवीस तासांच्या आतच कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेतली.

त्यानंतर संतप्त भाजपने जनता दलावर आणि नव्या युतीवर आगपाखड केली. मुख्यमंत्र्यांसह राजदच्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आता केंद्र सरकारला आव्हान केले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी (Central Investigation Agencies) माझ्या घरी येऊन छापा टाकावा, असे यादव म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी भाजप सरकारवरदेखील निशाणा साधला. देशातीळ तपास यंत्रणा भाजपचे कार्यकर्ते असल्यासारख्या वागत आहेत, असे देखील ते म्हणाले.

देशातील तपास यंत्राणांना मी आव्हान देतो, त्यांनी माझ्या घरी यावे पाहिजे तेवढे वेळ थांबावे आणि तपास करावा, असे यादव एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलले.

पाच वर्षांपूर्वी आमची म्हणजे राजद आणि संयुक्त जनता दल युती तुटली. त्यामुळे भाजप जनता दलावर दबाव टाकत होती. नितीश कुमार (Nitish Kumar) हे त्यांच्यासोबत अस्वस्थ होते, असे यादव म्हणाले.

तसेच आता झालेली युती ही पूर्वनियोजित युती नव्हती. हा अचानक झालेला निर्णय होता. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बसून राजकीय परिस्थितीचा अभ्यास करत हा निर्णय घेतल्याचे यादव म्हणाले.

यावेळी यादव यांनी देशातील विविध पक्षांच्या नेत्यांना आणि पक्षांना (Opposition Party) 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होऊ शकतात, तर नितीश कुमार (Nitish Kumar) का नाही, असे यादव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

आरे कारशेडवरुन ठाकरे आणि फडणवीस यांची जुंपली; फडणवीस म्हणाले ‘ठाकरे आपल्या अहंकारा…’

“जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस”; काय आहे प्रकरण?

“रवी राणा यांना हिंदू धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”

काही बाही बोलून पंतप्रधान पदाचे महत्व घसरवू नका; राहुल गांधींचा मोदींना सल्ला…

विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही नाराज; जयंत पाटील म्हणाले…