‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका

मुंबई | शिवसेनेतील बंडापासून स्वत:ला निश्चयाने दूर ठेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत प्रामाणिक राहिलेले आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना फोडण्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

भाजपात आता फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) एकटेच चाणक्य उरले असल्याचे जाधव म्हणाले. तसेच सुशील मोदी (Sushil Modi) यांच्या बिहारमधील वक्तव्यावरुन भाजपचा खरा विद्रुप चेहरा समोर आला, असे देखील जाधव म्हणाले.

आमचा विश्वासघात करणाऱ्या आणि बईमानी करणाऱ्या लोकांचा आम्ही पक्ष संपवितो, असे भाजपचे नेेते आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी बिहारमधील आघाडी सरकार पडल्यावर म्हणाले होते.

जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा केली होती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) काळजावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केल्याचे बोलले होते, मात्र त्यांना असे बोलायचे नव्हते, अशी सारवासारव फडणवीसांनी केली होती.

त्यामुळे आता देशात जणू देवेंद्र फडणवीसच भाजपचे एकटे चाणक्य उरले आहेत. अशा शब्दात भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

भाजपची विश्वासार्हता आता अजिबात उरलेली नाही, भाजप विरोधकांना नाहीतर आपल्याच मित्र पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करतो हाच भाजपचा इतिहास आणि परंपरा असल्याचे जाधव म्हणाले.

तसेच त्याचमुळे त्यांनी शिवसेनेसारखा जूना आणि 27 वर्षे त्यांच्यासोबत राहिलेला पक्ष फोडला. बंडखोरीनंतर भाजपतचे लोक आपला ह्यात सहभाग नाही म्हणत होते. पण जे भाजपच्या पोटात लपले होते ते सुशील मोदींच्या तोंडावर आले असल्याचे जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’

आरे कारशेडवरुन ठाकरे आणि फडणवीस यांची जुंपली; फडणवीस म्हणाले ‘ठाकरे आपल्या अहंकारा…’

“जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस”; काय आहे प्रकरण?

“रवी राणा यांना हिंदू धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”

काही बाही बोलून पंतप्रधान पदाचे महत्व घसरवू नका; राहुल गांधींचा मोदींना सल्ला…