हो खरंच… नाथाभाऊंच्या तोंडी फडणवीसांची स्तुती!

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी वारंवार स्वपक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. खासकरुन त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला होता. मात्र, आता त्यांचा सूर बदलल्याचं दिसत आहे.

सध्या राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सभागृहात देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते पक्षाची भूमिका उत्तम मांडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेले चार दिवस विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. तिथं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षाची भूमिका उत्तम मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतायेत असं चित्र आहे. आम्ही विधानसभेत असतानाही अशाच पद्धतीनं सरकारला जाब विचारायचो, असं खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपली पक्षावरील नाराजी उघडपणे दाखवली होती. तसेच पक्षात राहीन की जाईन भरवसा नाही, असं म्हटलं होतं. मात्र, आता त्यांनी नेत्यांचं कौतुक केल्याने चर्चा होऊ लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची निवड

-दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत ‘चेकमेट’ करण्याची खेळी?

-सुप्रिया सुळेेंच कौतुक करताना नाथाभाऊ म्हणतात…

-कोरोना पसरतोय जगभरात; महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु अडकले इराणमध्ये

-खटला चालवण्यास केजरीवाल सरकारने मंजुरी दिल्यानंतर कन्हैया कुमारची पहिली प्रतिक्रिया म्हणतो; …