मुंबई | विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेर सादर केला होता. ‘मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा’ हा तो शेर होता. मात्र हा शेर भाजपध्यक्ष अमित शहा यांनी सात वर्षांपूर्वी गुजरातमध्ये म्हटल्याचं समोर आलं आहे.
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ या नेत्यांनी फडणवीसांचं कौतुक करत त्यांना चिमटेही काढले. मात्र ही जोरदार फटकेबाजी करत सर्वांना शायरीतून प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने मला परत आणलं, 105 निवडून दिले, सर्वात मोठा पक्ष, जनादेश तोच होता. मी पुन्हा येईन, पण वेळ सांगितली नव्हती, त्यामुळे वाट बघा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, अमित शाह यांनी सात वर्षांपूर्वी हा शेर गुजरातमध्ये म्हटला होता. आता तोच देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा सादर केला.
महत्वाच्या बातम्या-
पंकजा मुंडे भाजप सोडणार?; चंद्रकांत पाटील म्हणतात… – https://t.co/qWhzOx1CfA @ChDadaPatil @Pankajamunde @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
“साहेबांच्या वाढदिवसादिवशी कार्यक्रमांची रेलचेल नको, शेतकऱ्यांना मदत करा” – https://t.co/kFjXqDvFaq @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवून सेनेत प्रवेश करणार?…- संजय राऊत-https://t.co/avOWN0Lx5A @Pankajamunde @rautsanjay61 @ShivSena @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019