हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावून दाखवा; फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई | भाजपकडून एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, एप्रिल महिन्याची वाट कशाला बघता, आज, आत्ता तुम्ही महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

हिंमत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा म्हणता, पण तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं म्हणत फडणवीसांनी पलटवार केला आहे. पुन्हा निवडणूक होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

सत्तेसाठी काही लोक एकत्र आले आहेत. मात्र, या लोकांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. कारण भाजप ही हरलेली नाही तर जिंकलेली टीम आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत, त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका भाजप नेत्यांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप ही हारलेली नाही तर जिंकलेली टीम आहे- देवेंद्र फडणवीस

-“इंदुरीकर बोलले त्यात चुकीचं काय?; कारवाई केली तर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू”

-“आपण कुठल्याही पक्षाचे असा…आता आपण सारे जण दिल्लीचे 2 कोटी लोक माझे कुटुंबीय आहात”

-कै.आर.आर.(आबा) पाटलांच्या नावाने सरकार देणार ‘हा’ पुरस्कार!

-“उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याच्या महत्वाकांक्षेसाठी या जनादेशाचा अनादर केला”