“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितलं तर यांची हातभर फाटली आणि सांगतात….”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर जोस सभा सुरु झाली आहे. त्यांनी आज आघाडी सरकारला चांगलंच घेरलेलं पहायला मिळालं.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धल ठाकरेंवर निशाणा साधला. यावेली त्यांनी बाबरी मशीदीवरुनही शिवसेनेला टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावण्याचं काम तुमच्या सरकारमध्ये होतंय. पण त्यांना वाटतं हेच महाराष्ट्र, मराठी आणि हिंदुत्व आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले परवा, बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या बिळात होते. मशिदींवरील भोंगे काढायला यांना जमलं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली.

मशिदींवरील भोंगे काढायला सांगितली तर यांची हातभर फाटली आणि सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली, असा हल्लाबोलही फडणवीसांनी केली आहे.

मी त्याला मशीद मानत नाही. कोणी हिंदू मशीद पाडू शकत नाही. तो ढाचाच होता. अभिमानाने सांगतो तो ढाचा आम्हीच पाडला, असंही फडणवीस म्हणाले.

आज संपूर्ण राज्याचं लक्ष देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभेकडे लागलं आहे. या दोन्ही सभांना सुरुवात झाली असून आघाडी सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “काही लोकांना वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे”

  “भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज करेल”

  “फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये”

  “राज ठाकरे हे भाजपचे पपेट आहेत”; धनंजय मुंडेंचा घणाघात 

  “ईडीची पीडा टाळण्यासाठी राज ठाकरेंची आजची सभा”