औरंगाबाद | औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेला सुरुवात झाली आहे. प्रचंड अशी गर्दी या सभेला पहायला मिळत आहे.
राज ठाकरेंची सभा सुरु होताच काही गडबड पहायला मिळाली. यावरुन राज ठाकरे भरसभेत भडकलेले पहायला मिळाले.
टाळकी गडबड करायला आली तर तिथल्या तिथं हाणा. ही मनसेची सभा आहे चौरंग करून घरी पाठविलं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे ठाकरे पुढे म्हणाले की, मी फक्त 2 सभा घेतल्या तरी एवढं बोलतात. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार. कोंमड झाकलं तरी सूर्य उगवतोच. कोकण, विदर्भात देखील सभा होणार.
राज ठाकरेंनी आजच्या सभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे.
राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून मैदान पूर्णपणे भरलं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सभेसाठी हजेरी लावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितलं तर यांची हातभर फाटली आणि सांगतात….”
“काही लोकांना वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे”
“भोंगे काढल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर मी सहा तास नमाज करेल”
“फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये”
“राज ठाकरे हे भाजपचे पपेट आहेत”; धनंजय मुंडेंचा घणाघात