शिवसेनेने घातल्या असेल बांगड्या पण आम्ही घातल्या नाहीत; पठाणांच्या वक्तव्यावरून फडणवीस आक्रमक

मुंबई |  गुलबर्ग्यातल्या CAA विरोधी मोर्चात आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदानात केलेल्या भाषणात वारीस पठाणांचा तर सत्तेत बससेल्या शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला.

कोण तो वारीस का लावारीस… त्याला सोडणार नाही. त्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू समाज हा सहिष्णू आहे. म्हणूनच भारत देश सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालतो. आम्हाला भारताचा… आमच्या हिंदू समाजाचा… तसंच अल्पसंख्याकांचा अभिमान आहे. पण हिंदू समाजाची सहिष्णुता जर हिंदू समाजाची दुर्बलता समजली जात असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

वारीस पठाण यांच्या वक्तव्यावर सत्तेत असलेल्या शिवसेनेने काहीही कारवाई केली नाही किंबहूना त्यावर जादा बोलणं टाळलं. शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही मात्र बांगड्या घातल्या नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी सेनेवर केली. त्यानंतर त्यांनी लगोलग ‘बांगड्या घालणं’ हा शब्दप्रयोग मागे घेताना महिलांना हा शब्द आवडत नाही. त्यामुळे मी हा शब्द वापरत नाही, असं म्हटलं.

शिवसेना मुग गिळून गप्प बसली असेल पण आम्ही मूग गिळून गप्प बसणार नाही. जर काहीही आणि कसंही वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ लावण्याचं काम काही लोकं करत असतील तर त्यांना तशाच प्रकारे उत्तर देण्याची धमक भाजपमध्ये आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुन्हा मैदानात जाऊन राज्य काबीज करेन; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

-शिवसेनेनं काय खायचं सोडलं? रस्त्यातलं डांबर, नाल्यातला कचरा; आशिष शेलारांची बोचरी टीका

-“तुम्हाला कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाहीये… तुम्ही शेतकऱ्यांना फसवून खेट्या मारायला लावल्या”

-…तर उद्धवजी अन् अजितदादा, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- फडणवीस

-सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका