ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई | अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही.  आम्ही केलेल्या कर्जमाफीला नावं ठेवली तीच पद्धत यांनी आत्मसात केली. महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सरकारची अजूनही कोणतीच दिशा ठरत नाही आणि सूरही गवसत नाही. आधी स्वतः त्यांनी आपल्यात सुसंवाद करावा नंतर विरोधी पक्षांशी संवाद साधावा, असं म्हणत फडणवीस यांनी तिन्ही पक्षांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी एनआयएकडे तपास आणि सीएए या दोन्ही बाबतीत त्यांनी परखड भूमिका घेतली. या दोन बाबींसाठी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कम्युनिस्ट पक्षाच्या ‘या’ नेत्याची नितीन गडकरी पुजा करायचे!

-देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीवर नितीन गडकरींची बॅटींग!

-विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी

-शेवटचे भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुरड्या शंभुराजांची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

-देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील