छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच कारण…- राणुआक्का

नाशिक | झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. यावर मालिकेतील राणू अक्काची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आश्विनी महांगडे यांनी खोतकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

खोतकरांविषयी मला आदर आहे. पण आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांना छ. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी किती यातना सोसल्या आहेत त्यांना कळायला हवं. इतिहासातील लेखणानुसार मालिकेत कुठेही रक्त दाखवलं जाणार नसल्याचं आश्विनी महांगडे यांनी सांगितलं आहे.

नाशिक महापालिकेच्या पुष्पप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या आल्या होत्या. यावेळी येताना आश्विनी महांगडे राणू अक्काच्या वेशात आल्या होत्या. नाशिककरांनीही आश्विनी महांगडे जोरदार स्वागत केलं.

दुसरीकडे मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा कोणताही भाग वगळणार असं कोणतही आश्वासन मी दिलं नाही. मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं अमोल कोल्हेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

-कम्युनिस्ट पक्षाच्या ‘या’ नेत्याची नितीन गडकरी पुजा करायचे!

-देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीवर नितीन गडकरींची बॅटींग!

-विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी

-शेवटचे भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुरड्या शंभुराजांची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट