माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई |   राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीसांनी माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे असं मिश्किलपणे सांगितलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

राज्याचं बजेट आणि आपल्या घरचं बजेट यात जास्त काही फरक नसतो. एवढंच की राज्याचं बजेट जरा व्यापकं असतं. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्यांच्या पगाराचा विचार करतो. आता माझ्यापेक्षा आमच्या घरात माझ्या बायकोला पगार जास्त आहे, असं फडणवीस म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.

2005 मध्ये अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी निगडीत कायदेही बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसहीत हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प कळावा या हेतूने लिहिलं आहे. पुस्तक लिहितानाच ते 40 मिनिटांत वाचून होईल 45 मिनिटं लागताच कामा नये, हा हेतू ठेवूनच लिहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या नेत्यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीसांवर मिश्किल कोट्या केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!

-मोदी पुढे… अमृता फडणवीस मागे; टाकलं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल!

-पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

-विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं काम अधिक खुलतं… अशीच पुस्तकं लिहीत रहा; पटोलेंची फटकेबाजी

-“गळ्याची आण… फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याने सगळ्यात जास्त आनंद मुनगंटीवारांना होईल”