एकनाथ खडसेंचं तिकीट मी नाही तर केंद्रीय नेतृत्वाने कापलं- देवेंद्र फडणवीस

मुंबई |  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद भाजपने पहिल्यांदा काढून घेतलं आणि त्यानंतर विधानसभेचं तिकीट नाकारून खडसेंना दुहेरी धक्का दिला. माझं तिकीट का कापलं? माझा गुन्हा काय आहे?  हा प्रश्न खडसेंनी वारंवार भाजप नेतृत्वाला विचारला. त्याचं उत्तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

एकनाथ खडसे यांना तिकीट मी नाकारलं नाही. आम्ही केंद्रीय कोअर कमिटीकडे शिफारस करतो आणि मग केंद्रीय नेतृत्व त्यावर निर्णय घेतं. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तो निर्णय घेतला, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

शिवसेनेने आमच्याशी विश्वासघात केला. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी गद्दारी केली. अजित पवार हे आमच्याकडे आले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, निवडणुकीत आमचा पराभव झालेला नाहीये. आम्हाला जनतेने नाकारलं नाही. आम्ही लढलेल्या 67 ते 70 टक्के जागा जिंकल्या आहेत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-