“गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी जे कष्ट घेतले त्याच्या कितीतरी पटीने पक्षाने त्यांना दिलंय”

मुंबई | गोपीनाथ मुंडे जवळपास 30 ते 40 वर्ष भाजपसाठी लढले. भाजपला गावोगावी पोहचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. परंतू पक्षासाठी त्यांनी जे जे काही केलं, पक्षाने त्याची परतफेड केलीये. त्यांना त्यांच्या कामापेक्षा कितीतरी पटीने अधिक पक्षाने दिलं आहे, असं वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.

5 वर्ष घरात एक आमदार, एक खासदार आणि गोपीनाथ मुंडेंसारखं वलय त्यांच्या पाठीमागे असताना त्यांना स्वत:चं घर, स्वत:चा मतदारसंघ सांभाळत आला नाही. अशा व्यक्तीला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, अशी जोरदार टीका काकडे यांनी पंकजा यांच्यावर केली आहे.

दुसरीकडे काकडेंनी मुंडे कुटुंबावर केकेल्या टीकेमुळे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काकडेंचा निषेध व्यक्त करताना मुंडे समर्थक दिसून येत आहेत. अशातच भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी काकडेंच्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. प्रसिद्धीसाठी त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. पंकजा ताईंचं पक्षासाठी काम मोठं आहे. काकडेंनी ताईंवर अशी टीका करायला नको होती, असं मिसाळ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, काकडेंच्या या चौफेर टीकेला आता खुद्द पंकजा मुंडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या-