बाबांचं वक्तव्य खरं असेल तर शिवसेनेचं आम्हाला भयंकर आश्चर्य वाटतंय- देवेंद्र फडणवीस

मुंबई | शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाणांच्या या वक्तव्याने भाजपच्या गोटामध्ये भूकंप झाला आहे. बाबांचं वक्तव्य खरं असेल तर शिवसेनेचं आम्हाला भयंकर आश्चर्य वाटतंय, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या नेत्याने केलंलं विधान गांभिर्याने घ्यावं लागेल. जर 2014 ला सुद्धा शिवसेना काँग्रेससोबत जायला तयार होती, तर ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. शिवसेना जर 2014 लाच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायला तयार होती तर त्यांचा खरा चेहरा यातून उघड होतोय, अशी टीकाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. शिवसेनेला विचारधारा तत्व मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का?, असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे 2014 साली शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकार बनवण्यासाठी त्यांची बोलणी झाली होती. मात्र त्यांच्या पक्षाची बोलणी झाली असेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारची बोलणी झाली नव्हती. हीच सत्य परिस्थिती असल्याचं, नवाब मलिकांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

-“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

-“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी