मुंबईत भाजप पोहोचणार 10 लाख गरजूंपर्यंत; अन्न-औषध वितरणाला प्राधान्य- फडणवीस

मुंबई | कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने अनेक लहान उद्योजकांच्या उद्योगाला खीळ बसली, गोरगरिबांना खायला अन्न मिळत नाही, जगावे कसे हा प्रश्न आहे. अशातच मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार आज मुंबई भाजपने केला. ही मदत करताना अन्न आणि औषध याला सर्वोच्च प्राधान्य द्या, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डात विशेष जबाबदारी घ्यायची आहे. आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात प्रत्येकाला मिळतील, हे त्यांनी सुनिश्चित करायचे आहे. मुंबईत रेल्वेस्थानकालगत किंवा पुलांखाली अनेक लोक राहतात. त्यांची संख्या मोठी आहे. त्याच्यापर्यंत सेवा पोहोचलीच पाहिजे, फडणवीस यांनी सांगितलं आहे.

फडणवीस यांनी आज राज्यातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जेथे भाजपा आमदार नाहीत, अशा विधानसभांतील प्रभारींशी संवाद साधला. या संवादातून अनेक जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणांचे लोक अडकले आहेत, हा एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. देशात सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने त्यांची आहे तेथेच सेवा करा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

दरम्यान, भाजपतर्फे अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषधी, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

-मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण; 50 जवानांना क्वारंटाईन

-लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

-हा निधी माझ्या आईकडून माझ्या आईसाठीच आहे- अक्षय कुमार

-इटलीत कोरोनाचा कहर; मृतांची संख्या 10 हजाराच्या वरती