अजितदादांचं कौतुक करत फडणवीस म्हणाले,”शिवसेनावाले बिचारे हात वर करुन…”

मुंबई | सध्या राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) विविध मुद्द्यांवर गंभीर चर्चा होताना दिसत आहे. मागील काही दिवसांनी अनेक विधेयके देखील पारित करण्यात आली आहेत. (devendra fadanvis targeted shivsena)

अधिवेशनाच्या चारही दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अशातच आजदेखील विधानसभेत फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

विविध मु्द्द्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक देखील केलं आहे. तर शिवसेनेला चिमटे देखील काढले आहेत.

या सरकारमध्ये अजित पवार सर्वांत फाद्यात आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत. जो निधी वाटप झाला त्यात राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त म्हणजे 2 लाख 50 हजार 388 कोटी रुपये मिळाले आहेत, असं फडणवीसांनी बोलताना म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचं देखील कौतुक केलंय.

काँग्रेसवाले देखील हुशार निघाले. काँग्रेसवाल्यांना रोज तक्रार करून 1 लाख 1 हजार 766 कोटी मिळाले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

यासर्वात मात्र आमचे शिवसेनावाले हात वर करून फसले, यांचे महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार आहेत, तरीही ते फसले, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे.

वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये शिवसेनेला 54 हजार 343 कोटीच मिळाले, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला चिमटे काढले आहेत. हे आकडे 2020-21 या वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेल्या निधीचे आहेत.

दरम्यान, ज्या शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. ज्या शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी असल्याचं  फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं