देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

मुंबई | महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले.

फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. भाजप एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे.

अखेर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. राज्याच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आज या निर्णयाबरोबर देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला, 120 चं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठापण दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांचे, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो, असं ते म्हणालेत.

या संबंधी भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिलं. हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठिशी आहे. ते मंत्रिमंडळात नसले तरी ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले… 

“सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे…” 

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना थेट इशारा, म्हणाले…