“…तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आमच्या समाधानासाठी मंत्रिमंडळाचे ठराव करू नका. ठराव करायचे असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवा. आमच्या समाधानासाठी काही करू नका. येणाऱ्या काळात दोन तृतियांश निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आहे.

पटलावरील सर्व कामकाज बाजूला करा. आता वाटल्यास तहकूब करा आणि आज ओबीसींच्या आरक्षणावरच चर्चा करा. यावर मार्ग काढायलाच पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालत आहेत, हे लक्षात ठेवा. तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील, पण आरक्षणाच्या बाबतीत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

काल सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्णपणे संपलंय. राज्य सरकारचं हसं झालं. 13-12-2019ला राज्यसरकारला डेडीकेटेड कमिशन तयार करुन ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगितलं. पण सव्वादोन वर्षात एक पैशाचं काम सरकारनं केला नाही. कोर्टानं अंतरिम अहवाल देण्याची परवानगी दिली होती. पण हा अहवाल म्हणजे एक प्रकारची थट्टा आहे, असं फडणवीस म्हणाले.

हा अहवाल कशाच्या आधारे तयार केला असं विचारलं तर त्यावर वकिलांना उत्तर देता येत नाही. अहवालावर साधी तारीख नव्हती, सह्या नव्हत्या. अशाप्रकारे कामकाजाची पद्धत असते का?, असा सवाल न्यायाधीशांनी केला. डेटा कुठून गोळा केला? कसा गोळा केला? याची काहीही माहिती अहवालात नाही. सामाजिक मागासलेपणाच्या डेटाचा कुठे उल्लेखच नाही. त्यावर कोर्टानं विचारलं की, मागच्या वेळी हीच आकडेवारी तुम्ही नाकारली आणि आता तुम्हीच ती नाकारता. याचा काय अर्थ? असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

अपेक्षित हे आहे की आरक्षण नसलं तर ओबीसींना न्याय मिळणार नाही. आरक्षण नसेल तर ओबीसींनी प्रतिनिधीत्व मिळणार नाही, याबाबत एक अवाक्षर या अहवालात नाही. हे डेडिकेटेड कमिशन आहे. आपण भुजबळ साहेबांना विचारा. आमची भूमिका सहकार्याची आहे. मदत करण्याची आहे. पण राज्य सरकार गंभीर आहे का? की कुणाच्या दबावाखाली आहे, असा सवाल फडणवीसांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

“प्रत्येक राज्यातराज्यपाल आहे, महाराष्ट्रात मात्र भाजपाल” 

कारने जाताना रस्त्यातच अचानक रॉकेट हल्ला; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर 

Audi खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का; कंपनीने केली ‘ही मोठी घोषणा 

‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ