मोठी बातमी! युक्रेनहून निघालेल्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी

नवी दिल्ली | युक्रेनहून भारताकडे निघालेल्या एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती आहे. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आले, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग (VK Singh) यांनी दिली आहे.

युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना पाठवले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग यांचा समावेश आहे.

मिशन गंगा चालवण्याच्या जबाबदारीसाठी व्हीके सिंग यांना पोलंडला पाठवण्यात आलं आहे. यापूर्वी व्हीके सिंग यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या 80 भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली.

दोन मार्चलाही युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. मृत चंदन जिंदाल हा पंजाबचा रहिवासी असून 4 वर्षांपूर्वी युक्रेनला तो मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता.

दोन फेब्रुवारी रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने चंदनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटलं होतं.

दरम्यान, रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरु आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मयादेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा (Operation Ganga) सुरु केलं आहे. या मोहिमेद्वारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना देशात परत आणलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“प्रत्येक राज्यात राज्यपाल आहे, महाराष्ट्रात मात्र भाजपाल” 

कारने जाताना रस्त्यातच अचानक रॉकेट हल्ला; युक्रेनमधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर 

Audi खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का; कंपनीने केली ‘ही मोठी घोषणा 

‘या’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील सर्वसामान्यांना मोठा फटका; आता ‘या’ गोष्टीही महागल्या