मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील ‘सागर’ या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला ‘रामटेक’ बंगला देण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारा वर्षा बंगाला देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रॉयलस्टोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनाही आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचसोबत मंत्रालयातील मंत्र्यांची कार्यालयेही रिक्त करण्यात आली होती.
दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यावर प्रशासनाने कार्यालय ताब्यात घेऊन बंगले रिकामे केले होते.
महत्वाच्या बातम्या-
काय पोरकट मुख्यमंत्री आहे, भीक का मागतोय- निलेश राणे – https://t.co/y3SWoCNj3H @meNeeleshNRane @uddhavthackeray #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
देवेंद्र फडणवीसांनी काॅपी केली अमित शहांची ‘ती’ शायरी! – https://t.co/QmDcuW5i2i @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
फडणवीसांनी शिवरायांच्या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे- संजय राऊत- https://t.co/eDfw916EwI @Dev_Fadnavis @ShivSena @rautsanjay61 @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019