भगवी शाल आणि औक्षणासोबत फडणवीसांचं शिवतीर्थावर स्वागत, पाहा फोटो

मुंबई | एकनाथ शिंदेंचं बंड व त्यामुळे आलेला राजकीय भूकंप अशा असंख्य घडामोडींनंतर तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पडलं व राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलं. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

शिवतीर्थावर देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी गेल्याने राज ठाकरेंनी भगवी शाल देत तर शर्मिला ठाकरेंनी औक्षण करत फडणवीसांचं स्वागत केलं. यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्री देखील उपस्थित होत्या.

राज ठाकरे आणि फडणवीसांचे राजकारणापलीकडील घरोब्याचे संबंध आहेत. तर काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे कृष्णकुंजवरून शिवतीर्थ या नवीन घरी राहायला गेल्यावरही देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती.

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, नुकतीच पायावर शस्त्रक्रिया पार पडल्याने राज ठाकरे यात कुठेच दिसले नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस शिवतीर्थावर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ही सदिच्छा भेट असून यावेळी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं फडणवीस म्हणाले. तर यावेळी या नेत्यांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती व आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंसोबतच मनसे नेत्यांसोबतही संवाद साधला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘… त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते, बिचारे मुख्यमंत्री’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या आधी ‘या’ बंडखोर आमदाराचं नाव, शिवसेनेचा खुलासा

‘शरद पवारांवर आरोप करून केसरकरांनी स्वत:च्याच बनियनमध्ये खळबळ माजवली’, शिवसेनेचा घणाघात

ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, दोघांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती