देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसांपासून आजारी असल्यानं सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित रहात नव्हते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं आहे.

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. राज्यातील राजकारणापासून ते केंद्रीय राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं.

गेली 25 वर्ष आम्ही भाजपसोबत वाया घालवली. भाजपनं माझा आणि शिवसेनेचा चेहरा वापरून निवडणुका जिंकल्या आहेत, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे आहे. ते फक्त बोलतात, असं फडणवीस म्हणाले आहेत.

माझा चेहरा वापरला असं महादेव जानकर आणि विनायक मेटे देखील म्हणाले होते. युतीमध्ये असताना सर्वांचेच चेहरे वापरले होते, असं उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणातील वाटचालीवर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र सांभाळा आम्ही देश सांभाळतो म्हणणाऱ्यांनी दगा दिला, असं ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान बाबरी मशिदीनंतरच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. तेव्हाच जर शिवसेना राष्ट्रीय राजकारणात उतरली असती तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात शिवसेनेनं 1993 मध्ये उमेदवार उतरवले पण त्यांच्या 179 उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त झाले, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”

अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले 

वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणाले,’अरे हा तर दुसरा विराट’