‘घोटाळा झालाय, चौकशी करा’; अण्णा हजारे यांचं अमित शहांना पत्र

मुंबई | देशातचे पहिले सहकारमंत्री म्हणून अमित शहा (Amit Shah) यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर सहकार मंत्र्यालयाचा वापर राज्यातील सहकार संपवण्यासाठी केला जात असल्याचं आरोप केला जात आहे.

या मंत्रालयाचा वापर राज्यातील या नेत्यांना संपवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप देखील केला जात होता. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

अण्णा हजारे यांनी अमित शहा यांना पत्र लिहून जाहीर मागणी केली आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी भाग भांडवल आणि जमिनी देऊन साखर कारखाने उभे केले आहेत, मात्र अनेक पक्षातील नेत्यांनी हे कारखाने कवडीमोलाने विकत घेतले, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

या प्रकरणातून आतापर्यंत अंदाजे 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचं देखील अण्णा हजारे म्हणाले आहेत. सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढीला लावण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

या सर्व प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील अण्णा हजारे यांनी केली आहे. यात केंद्रातील अधिकाऱ्यांच्या चूका असल्याचं त्यांनी या पत्रात लिहीलं आहे.

चौकशी केली तर कारखाने अप्रत्यक्षपणे राजकारण्यांनी कट रचून खरेदी केल्याचं उघड होईल, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमून या घोटाळ्याची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”

अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले