बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही- देवेंद्र फडणवीस

पुणे | पिंपरी-चिंचवडमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली.

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही नांगर घेऊन आलो आहे. ज्याचा बैलगाडा शर्यतींना विरोध आहे त्यांच्यासाठी, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

पिंपरी चिंचवड येथील टाळगाव चिखली मधील रामायण मैदानावर भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. याला फडणवीसांनीही हजेरी लावली.

काही लोक मला म्हणाले कि महेशदादा आणि तुम्ही एकसारखेच दिसतायत. मी त्यांना आसागितलं की मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल एकटा येत नाही तर जोडीने येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. हा जो काही उत्साह आहे. नांगर कोणाकरता आहे जो बैलगाडा शर्यतीला विरोध करतो त्यांच्या करता नांगर आहे, असं ते म्हणालेत.

आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केलाय आणि समारोपाच्या कार्यक्रमाला माझ्या अंगावर झूल चढवलीये, असंही फडणवीसांनी म्हटलं.

देशातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत भरवल्याबद्दल फडणवीस यांनी महेश लांडगेंचं अभिनंदन केलं. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीसांनी फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही” 

सर्व आमदारांसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 

Hyundai ची Mahindra ला जोरदार टक्कर; ‘ही’ जबरदस्त कार लवकरच बाजारात येणार 

Avinash Bhosale | अविनाश भोसले यांना न्यायालयाचा झटका 

राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ?; ‘या’ नेत्याने उचललं मोठं पाऊल